सेलू-परभणी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
परभणी, ११ सप्टेंबर (हिं.स.) : सेलू-परभणी रस्त्यावर विना परवाना आणि विना रॉयल्टी पावती अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी पकडला. जप्त केलेला ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाईसाठी सेलू तहसील कार्यालयात जमा करण्
सेलू-परभणी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त


परभणी, ११ सप्टेंबर (हिं.स.) : सेलू-परभणी रस्त्यावर विना परवाना आणि विना रॉयल्टी पावती अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी पकडला. जप्त केलेला ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाईसाठी सेलू तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

महसूल विभागाचे पथक सेलू-परभणी रस्त्यावर गस्त घालत असताना एमएच २२ एएम १९८३ क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळूची वाहतूक करताना आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक परवाना तसेच रॉयल्टी पावती नसल्याचे निदर्शनास आले.

महसूल विभागाने चौकशी केली असता सदर ट्रॅक्टर काजळी (रोहिना), ता. सेलू येथील विष्णू श्रीरंग कास्ते यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी तातडीने कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला. त्यानंतर जप्त वाहन सेलू तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

या कारवाईदरम्यान महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८(७) तसेच महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम, २०१३ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande