
पुणे, ११ सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना विविध घटकांचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी प्रात्यक्षिक लागवड किट, अस्तरीकरणासह नवीन शेततळे निर्मिती तसेच अस्तित्वातील शेततळ्यांचे अस्तरीकरण (कुंपणासह) या घटकांचा समावेश आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र आदिवासी शेतकऱ्यांनी १६ सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत आंबेगाव तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी केले आहे.
पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज साद करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु