सोलापूर : एसआयआर कामात हलगर्जी नको; मुदतीत काम पूर्ण करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश
सोलापूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतील काम अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून पूर्ण करावे. पात्र मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होईल, याची दक्षता घ्यावी. ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी
Voter


सोलापूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतील काम अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून पूर्ण करावे. पात्र मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होईल, याची दक्षता घ्यावी. ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन करून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करावे, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एसआयआरअंतर्गत सर्व मतदान नोंदणी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त तेली-उगले यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर आदी उपस्थित होते.

तेली-उगले यांनी सांगितले की, प्रारूप मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या दावे आणि हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी स्वतंत्र व नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. प्रत्येक दाव्या-हरकतीची नियमानुसार छाननी करून पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्याची कार्यवाही काटेकोरपणे करावी.एसआयआर प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवावा. कामात कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande