ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बँक ऑफ इंडियाचे 12 डिजिटल बँकिंग उपक्रम सुरु
* नवीन उपक्रमांमध्ये Omni Neo मोबाइल बँकिंग, प्रीमियम कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग आणि फिनटेक सहकार्याचा समावेश मुंबई, 12 सप्टेंबर (हिं.स.) - बँक ऑफ इंडियाने 9 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2026 मध्य
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 बँक ऑफ इंडिया दालन उद्घाटन


* नवीन उपक्रमांमध्ये Omni Neo मोबाइल बँकिंग, प्रीमियम कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग आणि फिनटेक सहकार्याचा समावेश

मुंबई, 12 सप्टेंबर (हिं.स.) - बँक ऑफ इंडियाने 9 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2026 मध्ये आपल्या वाढत्या डिजिटल क्षमतांचे प्रदर्शन केले. यावेळी पेमेंट्स, कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग, अनुपालन, ग्राहक सहभाग आणि फिनटेक सहकार्य अशा विविध क्षेत्रांतील 12 डिजिटल उपक्रम सुरु करण्यात आले.

बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि तंत्रज्ञान व फिनटेक भागीदारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बँकेच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.

हे उपक्रम बँकिंग सेवा अधिक सोप्या, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सुलभ करण्याच्या बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहेत. तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI), एजंटिक कॉमर्स, प्रोग्रामेबल डिजिटल करन्सी आणि डेटा-आधारित ग्राहक सहभाग यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बँकेच्या क्षमता अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे.

यावेळी बोलताना बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक म्हणाले, “भारताची वित्तीय सेवा परिसंस्था अशा नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे, जिथे नवोन्मेषामुळे ग्राहकांची सुलभता, सुरक्षितता आणि अनुभव यामध्ये ठोस सुधारणा होणे आवश्यक आहे. GFF 2026 मध्ये बँक ऑफ इंडियाने सादर केलेले उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची व्यापक पोहोच आणि विश्वासार्हता यांचा उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि मजबूत परिसंस्था भागीदारीसोबत मेळ घालण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करताना सर्वसमावेशक, विस्तारक्षम आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत उपाय विकसित करण्यावर आमचा भर कायम राहील.”

मोबाइल आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सक्षम डिजिटल पेमेंट्स

भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल पेमेंट्सच्या पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर बँकेने सहा महत्त्वपूर्ण उपक्रम सादर केले.

UPI Help 2.0 ग्राहकांना त्यांच्या UPI व्यवहारांचा इतिहास पाहण्यासाठी, तक्रारी नोंदवून त्यांचा मागोवा घेण्यासाठी तसेच बँक ऑफ इंडियाच्या खात्यांशी संबंधित मँडेट्स व्यवस्थापित करण्यासाठी एक अधिकृत इंटरफेस उपलब्ध करून देते. हे मँडेट्स कोणत्याही UPI अॅपद्वारे तयार केलेले असले तरी ग्राहकांना त्यांचे व्यवस्थापन करता येते.

बँक ऑफ इंडियाने ही सुविधा Omni Neo मोबाइल अॅपमध्ये समाकलित केली आहे. त्यामुळे बैंक ऑफ इंडिया ग्राहकांना Omni Neo अॅपवर त्यांच्या बैंक ऑफ इंडिया खात्याशी संबंधित मँडेट्स पाहता आणि व्यवस्थापित करता येतील.

UPI Help मधील आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे Transaction Replay. या सुविधेमुळे ग्राहकांनी यापूर्वी कोणत्याही UPI अॅपवरून केलेला व्यवहार, बैंक ऑफ इंडिया खाते Omni Neo अॅपशी लिंक असल्यास, पुन्हा सुरू करू शकतात. बँकेने, बैंक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी, UPI Tap & Pay on PoS सुविधाही सुरू केली आहे. या सुविधेद्वारे NFC-सक्षम स्मार्टफोनला समर्थित पॉइंट-ऑफ-सेल (PoS) टर्मिनलवर टॅप करून कॉन्टॅक्टलेस UPI पेमेंट करता येते.

बैंक ऑफ इंडिया ग्राहक Omni Neo मोबाइल अॅपवर Tap & Pay सुविधा सुरू करून ते Tap & Pay व्यवहारांसाठी डीफॉल्ट अॅप म्हणून निवडू शकतात. ₹5,000 पेक्षा कमी रकमेच्या खरेदीवेळी व्यापाऱ्याकडून UPI Collect Request सुरू केली जाईल आणि ग्राहकाने फक्त PoS मशीनवर फोन टॅप केल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल.

मोबाइल बँकिंग क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे Unified Ticketing Platform. NPCI Bharat BillPay Limited ने विकसित केलेले हे व्यासपीठ मेट्रो, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी इंटरऑपरेबल QR-आधारित तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

या प्लॅटफॉर्मच्या एकत्रीकरणामुळे सहभागी वाहतूक आणि पर्यटन सेवा प्रदाते या प्लॅटफॉर्मशी जोडले गेल्यानंतर बँक ऑफ इंडियाचे ग्राहक Omni Neo मोबाइल अॅपद्वारे स्थानिक वाहतूक तसेच पर्यटन स्थळांसाठी तिकिटे बुक करू शकतील. बँक ऑफ इंडियाने UPI आणि RuPay कार्ड्ससाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सक्षम पेमेंट सोल्यूशन्सदेखील सादर केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande