पंतप्रधान मोदींनी इस्रायल आणि जगभरातील ज्यू समुदायाला रोश हशनाहच्या दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलची जनता आणि जगभरातील यहुदी समुदायाला रोश हशनाहच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. नवीन वर्ष सर्वांसाठी शांतता, आशा, उत्तम आरोग्य आणि
PM MODI NETAYAHU ISRAIL ROSCH


नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, इस्रायलची जनता आणि जगभरातील यहुदी समुदायाला रोश हशनाहच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. नवीन वर्ष सर्वांसाठी शांतता, आशा, उत्तम आरोग्य आणि सातत्यपूर्ण प्रगती घेऊन येवो, अशी त्यांनी कामना केली.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यामावरील पोस्ट मध्ये लिहिलेः

शाना तोव्हा!

पंतप्रधान नेतन्याहू, इस्रायलची जनता आणि जगभरातील ज्यू समुदायाला रोश हशनाहच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सर्वांसाठी शांतता, आशा, उत्तम आरोग्य आणि निरंतर प्रगती घेऊन येवो. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये हिंदीऐवजी इंग्रजी आणि हिब्रू भाषेतही शुभेच्छा संदेश शेअर केला.

विशेष म्हणजे, रोश हशनाह हा यहुदी धर्मातील प्रमुख सण आणि यहुदी नववर्ष म्हणून साजरा केला जातो. हिब्रू दिनदर्शिकेतील तिशरी महिन्याच्या पहिल्या तारखेपासून या सणाला सुरुवात होते. वर्ष २०२६ मध्ये रोश हशनाह ११ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून १३ सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत साजरा केला जात आहे. यहुदी परंपरेत हा सण जगाच्या निर्मितीचा वर्धापनदिन आणि आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणूनही पाहिला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande