इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांनी घेतली भारताच्या राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) - इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी आज, 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. अध्यक्ष पेझेश्कियान यांच्या पहिल्या भारत भ
इराण इस्लामिक प्रजासत्ताक अध्यक्ष भारत राष्ट्रपती भेट


नवी दिल्ली, 12 सप्टेंबर (हिं.स.) -

इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी आज, 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

अध्यक्ष पेझेश्कियान यांच्या पहिल्या भारत भेटीनिमित्त त्यांचे स्वागत करताना, भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात इराणने दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रपतींनी कृतज्ञता व्यक्त केली.

या दोन्ही नेत्यांनी इराण आणि भारत यांच्यातील मैत्रीचे दीर्घकालीन संबंध, तसेच दोन्ही देशांमधील दृढ सांस्कृतिक आणि नागरिक ते नागरिक संपर्क संबंधांवर चर्चा केली. या प्रदेशात शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याबाबत भारताची कटिबद्धता राष्ट्रपतींनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि संघर्ष हे संवाद व मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande