येवल्यात डंपरच्या धडकेत कोपरगावच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू
येवला, 13 सप्टेंबर (हिं.स.)। येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर एका भरधाव डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अत्यंत दुर्दैवी ठरला असून डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही जागीच प्राण गेल
Terrible accident in Yeola:


येवला, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर एका भरधाव डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अत्यंत दुर्दैवी ठरला असून डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही जागीच प्राण गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ मोहम्मद शेख (वय ३२) आणि सईफ रफिक शेख (वय १७), दोघे रा. कोपरगाव (खाटीक समाज), हे आपल्या MH 17 BW 5864 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून जात असताना उपजिल्हा रुग्णालयासमोर MH-12 LT-9980 क्रमांकाच्या डंपरने त्यांना चिरडले. अपघात एवढा भीषण होता की, डंपरच्या चाकाखाली आल्याने दोघांचाही गंभीर दुखापतीमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोपरगाव येथील दोन तरुण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसर आणि खाटीक समाजात तीव्र शोककळा पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande