सभासदांच्या हितासाठी आधुनिक सेवा व कल्याणकारी योजनांना प्राधान्य देणारी मराठवाड्यातील ही एकमेव पतसंस्था : माजी मंत्री आ. संजय बनसोडे
लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)। *उदगीर, देवणी, जळकोट शिक्षक सहकारी पतसंस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात* : उदगीर, देवणी, जळकोट तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था ही लातूर जिल्ह्यातील कर्मचारी पगारदार पतसंस्थांमध्ये QR कोड सेवा सु
संजय बनसोडे


लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

*उदगीर, देवणी, जळकोट शिक्षक सहकारी पतसंस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

: उदगीर, देवणी, जळकोट तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था ही लातूर जिल्ह्यातील कर्मचारी पगारदार पतसंस्थांमध्ये QR कोड सेवा सुरू करणारी पहिली पतसंस्था ठरली आहे. या आधुनिक सेवेचा मोठा फायदा सभासदांना होणार असून, कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या सभासदांकडील थकबाकी वसुलीसाठीही या सेवेची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सभासदांची गैरसोय दूर होऊन संस्थेच्या व्यवहारात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येण्यास मदत होईल सभासदांच्या हितासाठी आधुनिक सेवा व कल्याणकारी योजनांना प्राधान्य देणारी मराठवाड्यातील ही एकमेव पतसंस्था असल्याचे मत आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या आर्थिक व सामाजिक गरजा लक्षात घेऊन विविध योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सभासदांच्या मुलींच्या विवाहासाठी ११ हजार रुपये कन्यादान म्हणून देण्याची योजना ही विशेष उल्लेखनीय असून, आतापर्यंत तब्बल २१७ सभासदांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सभासदांच्या कुटुंबाच्या सुख-दुःखात संस्था सहभागी होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, नगरसेवक सचिन हुडे, रामराव बिरादार, पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी इरकर, सचिव सर्जेराव भांगे, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उदगीर नगरीमध्ये उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, उदगीर-देवणी-जळकोटची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी सभासदांना शुभेच्छा देत संस्थेच्या प्रगतीचा आणि सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा गौरव केला.

तसेच सभासद पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कमी व्याजदरात एक लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण हा प्रगतीचा पाया असून, सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अशा योजना राबविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पतसंस्थेने आर्थिक व्यवहारांसोबतच सभासदांच्या सामाजिक आणि कौटुंबिक गरजांचीही दखल घेत विविध उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सभासदांचे अभिनंदन केले.

सभासदांचा विश्वास, संस्थेची पारदर्शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यांच्या बळावर ही पतसंस्था भविष्यात आणखी प्रगती करेल, असा विश्वासही माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

सभेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचे तसेच सर्व सभासद बंधू-भगिनींचे स्वागत करण्यात आले. सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande