
परभणी, 14 सप्टेंबर (हिं.स.)।परभणी महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी गणेश महामंडळाच्या वतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये श्री गणेशाची उत्साहात स्थापना करण्यात आली. यावेळी उपायुक्त तुकाराम कदम यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा करण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे महापालिका कार्यालयात आगमन झाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपायुक्त कदम यांचा सत्कार संघटनेचे लक्ष्मण जोगदंड यांनी केला. यावेळी नगरसचिव विकास रत्नपारखी, मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, बाळासाहेब कुलकर्णी, मनोज तळेकर, राजेभाऊ मोरे, मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विनय ठाकूर, उपाध्यक्ष लक्ष्मण जोगदंड, सरचिटणीस मनोज गहलोत, कोषाध्यक्ष कुणाल भारसाकळे, सहसचिव मनोज तळेकर, पंकज देशमुख,संगीता उबाळे, आरती प्रमुख दिलीप बनसोडे, भागवत कडनूर, ज्योती मोरे, सदस्य प्रकाश गायकवाड, किरण गायकवाड, शेख इस्माईल, जोगिंदर काकडा, ज्ञानोबा मस्के, राहुल तालेवार, गोपाल मोहटे, विनोद गहलोत, विठ्ठल शेळके, मुजमुले, अंबादास शिंदे, दिलीप बनसोडे, विशाल उपाडे, सुमित दरक, करे, कन्नूर आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis