
मुंबई, 14 सप्टेंबर (हिं.स.) - गणेश चतुर्थी निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सोमवारी (दि. १४) आपल्या लोकभवन येथील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.
यावेळी राज्यपालांनी आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह गणरायाची आरती केली व उपस्थितांना गणेश चतुर्थी व गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी