परभणी पोलिसांकडून आदर्श गणेशोत्सव पुरस्कार योजना
परभणी, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत, सौहार्दपूर्ण आणि डीजे-डॉल्बीमुक्त वातावरणात पार पडावा, यासाठी परभणी पोलिसांच्या वतीने ‘परभणी पोलीस आदर्श गणेशोत्सव पुरस्कार २०२६’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सार्वजनिक गणेश
परभणी पोलिसांकडून आदर्श गणेशोत्सव पुरस्कार योजना


परभणी, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत, सौहार्दपूर्ण आणि डीजे-डॉल्बीमुक्त वातावरणात पार पडावा, यासाठी परभणी पोलिसांच्या वतीने ‘परभणी पोलीस आदर्श गणेशोत्सव पुरस्कार २०२६’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रत्यक्ष पाहणी करून १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी एकूण १० निकष निश्चित करण्यात आले असून प्रत्येक निकषाला प्रत्येकी १० गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये डीजे-डॉल्बीमुक्त गणेशोत्सव, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था, स्वयंसेवकांची नियुक्ती, मूर्ती सजावट व देखावा, गणेश मंडळाची स्वच्छता, गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, महिलांचा सहभाग, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन, कायद्याचे पालन तसेच विविध स्पर्धांचे आयोजन या बाबींचा समावेश आहे.

या निकषांनुसार नियुक्त समितीकडून गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात येईल. त्यानंतर मंडळांना गुणांकन देण्यात येणार असून, सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या मंडळांची क्रमवारी निश्चित केली जाईल. पोलीस ठाणे स्तरावर तीन क्रमांक निवडण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरील पहिल्या दोन मंडळांची शिफारस संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हास्तरासाठी करतील. या शिफारशींमधून जिल्हास्तरावर पुन्हा मूल्यांकन करून प्रथम तीन क्रमांकांची निवड करण्यात येणार असून, या मंडळांना ‘परभणी पोलीस आदर्श गणेशोत्सव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरिकांना सुविधा देणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande