
रत्नागिरी, 14 सप्टेंबर (हिं.स.) । सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिकस आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने रुक्मिणी भिकाजी डोर्लेकर ऊर्फ वाघे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी २२२२, १५५५, ११११ रुपये आणि प्रमाणपत्र तसेच ५५५ रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी घरगुती सजावटीचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ पाठवावा. व्हिडीओमध्ये सुरुवातीला नाव व सजावटीचे स्वरूप सांगावे, व्हिडीओ शूटिंग मोबाइल आडवा धरून करावी. स्पर्धेचा कालावधी गणेश चतुर्थी ते अनंत चतुदर्शीपर्यंत असेल. परीक्षणामध्ये ५० टक्के गुण सादरीकरण, २० टक्के गुण लाइक्स, २० टक्के गुण व्ह्यूजसाठी आणि १० टक्के गुण व्हिडीओ शूटिंगसाठी दिले जातील. व्हिडीओ, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम अथवा ईमेलद्वारे धनंजय मोसमकर (9834365100) किंवा वासुदेव वाघे (7387648793) यांच्याकडे पाठवावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी