सायबर फसवणुकीपासून पोलीस भरतीपर्यंत विविध माहिती नागरिकांना उपलब्ध
लातूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर पोलीस विभागाच्या वतीने नागरिकांना पोलीस विभागाच्या कार्याची माहिती, विविध जनजागृती संदेश आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट्स सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी सोशल मीडियावर अधिकृत पेजेस निर्माण क
पोलीस अधिक्षक अमोल तांबे


लातूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)।

लातूर पोलीस विभागाच्या वतीने नागरिकांना पोलीस विभागाच्या कार्याची माहिती, विविध जनजागृती संदेश आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट्स सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी सोशल मीडियावर अधिकृत पेजेस निर्माण करण्यात आलेली आहेत. या पेजेसच्या माध्यमातून नागरिकांना दररोज विविध विषयांवरील माहिती देण्यात येत असून, नागरिकांनी लातूर पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसला फॉलो करून सतत अपडेट राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी मार्गदर्शन

सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक आहे. लातूर पोलीस विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवर सायबर फ्रॉड, ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपीची सुरक्षितता, सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षा तसेच विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. नागरिकांना सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीची माहिती देऊन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले जातनवीन कायदे, गुन्हेगारीविषयक माहिती आणि न्यायालयीन निकाल

लातूर पोलीस विभागाच्या सोशल मीडिया पेजेसवर नवीन कायद्यांबाबत नागरिकांना माहिती देण्यात येते. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारीविषयक घडामोडी, गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्यास त्याबाबतची नागरिकांना आवश्यक सतर्कता, तसेच पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांची माहिती प्रसारित केली जाते.

न्यायालयाकडून एखाद्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा सुनावण्यात आल्यास, त्याबाबतची अधिकृत माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येते. त्यामुळे नागरिकांना कायद्याची माहिती, पोलिसांची कार्यवाही आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत अधिक जागरूक राहण्यास मदत होते.

*महिला, मुली आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मार्गदर्शन*

महिला व मुलींना अनोळखी क्रमांकावरून फोन करून धमक्या देणे, त्रास देणे किंवा ऑनलाइन माध्यमातून छळ करणे अशा प्रसंगी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत लातूर पोलीस विभागाच्या सोशल मीडिया पेजेसवर मार्गदर्शन केले जाते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये घाबरून न जाता कायदेशीर मदत कशी घ्यावी, याची माहिती नागरिकांना देण्यात येते.

विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे पोलीस विद्यार्थी संवाद, सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती तसेच इतर विद्यार्थीहिताचे उपक्रम यांची माहितीही सोशल मीडियावर प्रसारित केली जाते. त्याचबरोबर पोलीस भरतीसंबंधी अधिकृत माहिती, सूचना आणि आवश्यक अपडेट्स नागरिकांना मिळू शकतात.

*शेतकरी, सोसायटीधारक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी माहिती*

लातूर पोलीस विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येणारे प्रयत्न, तसेच सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आयोजित करण्यात येणारे जनजागृती व सुरक्षा उपक्रम याबाबतची माहितीही अधिकृत सोशल मीडिया पेजेसवर उपलब्ध करून देण्यात येते.

पोलीस विभागाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती, नागरिकांसाठी करण्यात येणारे आवाहन, वाहतूक सुरक्षा, सण-उत्सवांच्या काळातील मार्गदर्शक सूचना आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande