
नांदेड, 14 सप्टेंबर (हिं.स.)। संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आज भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेश चतुर्थीचा मंगलमय सण साजरा होत आहे. ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. याच मंगलमय वातावरणात आमदार अमर राजूरकर कुटुंबीयांच्या घरी श्री गणरायाचे आगमन झाले. यावेळी संपूर्ण राजूरकर कुटुंबीयांसमवेत गणरायाचे विधिवत पूजन करत गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, यश आणि समाधान नांदो. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि सर्वांच्या घरात आनंद, प्रेम व सकारात्मकतेचे वातावरण सदैव राहो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis