इंग्लंडचा श्रीलंकेवर ११९ धावांनी दणदणीत विजय, कर्णझार हॅरी ब्रुकची शतकी खेळी
लंडन, 16 सप्टेंबर (हिं.स.) । तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला ११९ धावांनी पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. साउथम्पटन येथील रोझ बाऊल मैदानावर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत चार गडी गमावून २५४ ध
हॅरी ब्रुक


लंडन, 16 सप्टेंबर (हिं.स.) । तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला ११९ धावांनी पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. साउथम्पटन येथील रोझ बाऊल मैदानावर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत चार गडी गमावून २५४ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ १९ षटकांत १३५ धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार हॅरी ब्रुक आणि जोस बटलर हे इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ब्रुकने शतक झळकावले, तर बटलरला शतक करता आले नाही.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकला. माजी कर्णधार जोस बटलरने ४४ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांसह ८० धावांची स्फोटक खेळी करून डावाची सुरुवात केली. बटलरने वेगाने धावा करणे सुरूच ठेवले आणि एका क्षणी तो शतक पूर्ण करेल असे वाटत होते, पण त्याचा डाव ८० धावांवर संपला. असे असूनही, त्याने इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी एक भक्कम पाया रचून दिला.

बटलरनंतर कर्णधार हॅरी ब्रुकने सूत्रे हाती घेतली आणि श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ब्रुकने १० चौकार आणि सहा षटकारांसह अवघ्या ४९ चेंडूंमध्ये नाबाद ११४ धावा केल्या. ब्रुकने अवघ्या २० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर ४२ चेंडूंमध्ये आपले दुसरे टी२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने २० षटकांत चार गडी गमावून २५४ धावा केल्या. आपल्या शानदार खेळीसाठी ब्रुकला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

इंग्लंडकडून, अनेउरिन डोनाल्डने पाच चेंडूंमध्ये १२ धावा केल्या. टॉम बेंटनने १० चेंडूंमध्ये १० धावांचे योगदान दिले, तर विल जॅक्सने १२ चेंडूंमध्ये २१ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुष्मंथा चमीरा, दुनिथ वेललागे, एहसान मलिंगा आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande