बीडकरांच्या स्वप्नातील एक सोनेरी प्रवास... बीड ते पुणे कनेक्ट!
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। बीडकरांच्या स्वप्नातील एक सोनेरी प्रवास... बीड ते पुणे कनेक्ट झाले असल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले. आमदार मुंडे म्हणाले की, मागील वर्षी याच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी स्व. अजितदादानी शब्द दिला होता
अ


बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

बीडकरांच्या स्वप्नातील एक सोनेरी प्रवास... बीड ते पुणे कनेक्ट झाले असल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आमदार मुंडे म्हणाले की, मागील वर्षी याच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी स्व. अजितदादानी शब्द दिला होता की मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी आज बीड ते अहिल्यानगर रेल्वे सुरू करत असलो तरी एका वर्षात ती पुण्याला जोडली जाईल; आज दादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात हे स्वप्न आणि दादांनी दिलेला शब्द पूर्ण होताना पाहून एक वेगळाच आनंद आहे! आजपासून आमची बीडची रेल्वे पुण्यापर्यंत धावणार आहे.

परळी वैद्यनाथ - बीड - अहिल्यानगर ते पुढे पुणे - मुंबई कनेक्ट असे समस्त बीडकरांनी मागील अनेक दशकांपासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांसहित रेल्वे आंदोलन कृती समिती तसेच यासाठी योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात सर्वांचेच अभिनंदन आणि आभार.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande