हिंगोलीत मानाचे श्री सार्वजनिक गणेश मंडळात पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते आरती संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। हिंगोली शहरातील मानाचे आणि १०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या ''श्री सार्वजनिक गणेश मंडळा''ला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी बाप्पाची विधिवत पूजा-अर्चा करून आरती केली.
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

हिंगोली शहरातील मानाचे आणि १०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या 'श्री सार्वजनिक गणेश मंडळा'ला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी बाप्पाची विधिवत पूजा-अर्चा करून आरती केली. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी अनिल पतंगे, दिलीप चव्हाण, फुलाजीराव शिंदे, मिलिंद यंबल, गणेश मंडळाचे अध्यक्ष विलास गोरे, कपील मुंदडा, राजकुमार देशमुख यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शतकोत्तरी परंपरा असलेल्या या मंडळाच्यावतीने पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. आरतीनंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande