धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईवर प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि पावसात दीर्घ खंड पडल्याने जिल्ह्यासमोर संभाव्य पाणीटंचाईचे आव्हान निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय विशेष पाणीटंचाई आराखडे तयार करण्यात आले असून उपलब्ध जलसाठ
धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईवर प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन


छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि पावसात दीर्घ खंड पडल्याने जिल्ह्यासमोर संभाव्य पाणीटंचाईचे आव्हान निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय विशेष पाणीटंचाई आराखडे तयार करण्यात आले असून उपलब्ध जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन केले जात आहे. नागरिकांसह पशुधनाला पाणी उपलब्ध राहावे यासाठी पर्यायी जलस्रोतांचा वापर,अनधिकृत पाणीउपसा रोखणे आणि जलस्रोतांचे नियोजन यावर भर देण्यात येत असल्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीसांगितले.

“पाणी अडवा, पाणी जिरवा आणि उपलब्ध पाणी जपून वापरा,”हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता लोकचळवळ बनविण्याचे आवाहन त्यांनी केले.नाला बांध,बंधारे, पाझर तलाव, सूक्ष्म पाणलोट क्षेत्र विकास, शेततळी,सिमेंट नाला बांध आणि चेकडॅमच्या कामांना गती देऊन भूजलपातळी वाढविण्याचा दीर्घकालीन संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे.‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’च्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. कमी व्याजदरात कर्ज, नियमित कर्जफेडीस प्रोत्साहन, शेतीमालासाठी व्यापक बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यावरही भर देण्यात येत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande