छ.संभाजीनगर : औंढा नागनाथ विकास आराखड्यास १९३ कोटी ५५ लाखांची मान्यता
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या विकास आराखड्यास दोन टप्प्यात एकूण १९३ कोटी ५५ लाख रुपयांच्या सुधारित विका
अ


छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या विकास आराखड्यास दोन टप्प्यात एकूण १९३ कोटी ५५ लाख रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली आहे. या माध्यमातून मंदिर व परिसरातील मंदिरांचे संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासह जिल्ह्यातील विविध विकासकामांवर भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील अण्णासाहेब टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी पालकमंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय मालतीबाई पैठणकर, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, यांच्यासह सर्व जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुख उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतरही देशातील काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद ही संस्थाने विलीन झाली नव्हती. हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून हा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा हा लढा होता. सतत 13 महिन्यांच्या आंदोलनात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली. त्यातून आजचा हा दिवस 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाल्याने पाहता आला. या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 78 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. याबाबत पालकमंत्री यांनी जनेतला शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय पोषण माह-२०२५ मध्ये हिंगोली जिल्ह्याने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नातून पोषण, मातृ-बाल आरोग्य, स्वच्छता व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याचा गौरव करण्यात आला याबाबत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी कौतुक केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande