परभणात ऑटो-स्कुटीची धडक; तरुणाचा मृत्यू : महिला गंभीर
परभणी, 17 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील किन्होळा शिवारात ऑटो आणि स्कुटीची धडक होऊन 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी महिलेवर परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे
अपघात लोगो


परभणी, 17 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील किन्होळा शिवारात ऑटो आणि स्कुटीची धडक होऊन 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी महिलेवर परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मानवत येथील कृष्णा बालाजी पोंदाळ (वय 22) व सारिका बालाजी पोंदाळ (वय 40) हे एमएच 24 एआर 4671 क्रमांकाच्या स्कुटीवरून मानवतकडून परभणीकडे जात होते. यावेळी परभणीकडून मानवतकडे जाणार्या एमएच 22 एएन 2698 क्रमांकाच्या ऑटोसोबत त्यांच्या स्कुटीची धडक झाली. या अपघातात कृष्णा पोंदाळ यांचा मृत्यू झाला, तर सारिका पोंदाळ गंभीर जखमी झाल्या.

दरम्यान, किन्होळा-खरवडे शिवारातील महामार्गावर मोठा खड्डा पडला असून, याच खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधित यंत्रणेने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande