
कोल्हापूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी केले.
कोल्हापूर शहरातील प्रमुख मानाच्या मंगळवार पेठेतील श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमावेळी ते बोलत होते. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी उपस्थित श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक व उपस्थित भाविकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांसह मोफत तपासणी, औषधोपचार सुविधांची माहिती यावेळी त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar