मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावरत आ. प्रसाद लाड यांची नियुक्ती
Y.  Ch.  M.  MLA Prasad Lad appointed to the University's Management Board
Y.  Ch.  M.  MLA Prasad Lad


नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.)। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आधि सभेच्या व्यवस्थापन मंडळावर विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतची अधिकृतपणे घोषणा एका स्वतंत्र परिपत्रकानुसार करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य म्हणजेच व्यवस्थापन मंडळावरती मागील काही वर्षापासून सदस्याची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती त्यामुळे हे पद रिक्त होतं इतर विद्यापीठांमध्ये अशा स्वरूपाच्या नियुक्ती करण्यात आलेल्या होत्या परंतु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या या नियुक्त बाकी होत्या यामध्ये विधानमंडळ सचिवालयाच्या वतीने उपसचिव मोहन काकड यांनी नवीन परिपत्रक क्रमांक 16330/ वि.स./इ/2 दिनांक 17 सप्टेंबर 26 यानुसार विधान परिषदेचे सदस्य असलेले प्रसाद लाड यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावरती नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती 29 डिसेंबर 2025 पासून लागू करण्यात आली असून ती सात जुलै 2018 पर्यंत कायम राहणार आहे असे या नवीन परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande