धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १० तलवारी जप्त
धुळे, 17 सप्टेंबर (हिं.स.) सुरतहून दोंडाईचाकडे धारदार शस्त्रे आणली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १० तलवारी जप्त केल्या. या कारवाईत तलवारींसह एक आलिशान कार असा पाच लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसां
धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १० तलवारी जप्त


धुळे, 17 सप्टेंबर (हिं.स.) सुरतहून दोंडाईचाकडे धारदार शस्त्रे आणली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १० तलवारी जप्त केल्या. या कारवाईत तलवारींसह एक आलिशान कार असा पाच लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी दोंडाईचा परिसरात सापळा रचला. संशयित कार येताच पोलिसांनी ती अडवून झडती घेतली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दहा धारदार तलवारी आढळून आल्या या प्रकरणातील मुख्य संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शस्त्रसाठ्याचा स्रोत आणि त्याच्या वाहतुकीमागील कारणाचा तपास केला जात आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी नेमक्या कोणत्या उद्देशाने आणल्या जात होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तलवारी विक्रीसाठी आणल्या होत्या की एखाद्या गुन्ह्यासाठी त्यांचा वापर करण्याचा कट होता, यासह विविध शक्यता तपासल्या जात आहेत. शस्त्रे कुणाकडून मिळाली आणि ती कुठे पोहोचवली जाणार होती, याचाही शोध घेतला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande