नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले. या ध्वज वंदन कार्यक्रमास निवा
Q


नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.

या ध्वज वंदन कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, तहसीलदार शंकर लाड, विपीन पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande