अमरावती : यूपीआय शुक्लाबाबत ग्रामीण भागात संभ्रम
अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.)। अनेकजण रोख रकमेऐवजी मोबाईलवरून व्यवहार करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, वारंवार यूपीआय व्यवहार केल्यानंतर बँक खाते किंवा संबंधित ऍपकडून नेमके किती शुल्क आकारले जाते, याबाबत शेतकरी, शेतमजूर आणि मध्यमवर्गीय नागरिकांमध
यूपीआयवर भर; कपातीबाबत संभ्रम!


अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.)। अनेकजण रोख रकमेऐवजी मोबाईलवरून व्यवहार करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, वारंवार यूपीआय व्यवहार केल्यानंतर बँक खाते किंवा संबंधित ऍपकडून नेमके किती शुल्क आकारले जाते, याबाबत शेतकरी, शेतमजूर आणि मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

शासनाकडून मागील काही वर्षांपासून डिजिटल व कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरांबरोबरच ग्रामीण भागातही यूपीआय पेमेंटचा वापर वाढला आहे. चहाच्या टपरीपासून किराणा दुकानापर्यंत आणि शेतीमालाच्या व्यवहारापासून विविध बिलांच्या भरण्यासाठी युपीआयचा वापर केला जात आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे आता स्मार्टफोन असून, त्यावर विविध यूपीआय ऍपच्या माध्यमातून दररोज अनेक छोटे-मोठे व्यवहार केले जातात. पैसे पाठवणे, स्वीकारणे, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, ऑनलाइन खरेदी अशा विविध कारणांसाठी यूपीआयचा वापर वाढला आहे. त्यामुळे ‘व्यवहार करताना शुल्क दिसत नाही, महिन्याच्या शेवटी खात्यातून काही रक्कम वजा होते का?’ हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेषतः अल्प उत्पन्न असलेल्या शेतकरी व शेतमजूर वर्गासाठी काही रुपयेही महत्वाचे असतात. त्यामुळे डिजिटल व्यवहाराचा वापर करताना शुल्काची स्पष्ट माहिती मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. अनेकांना यूपीआय व्यवहार, बँक, अॅप आणि इतर सेवांचे शुल्क यातील फरक स्पष्टपणे माहिती नसल्याने संभ्रम वाढत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande