गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी कोटेशन सादर करण्याचे आवाहन
जळगाव, 17 सप्टेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निर्देशानुसार गणेशोत्सवानिमित्त दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ३६ जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवावर
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी कोटेशन सादर करण्याचे आवाहन


जळगाव, 17 सप्टेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निर्देशानुसार गणेशोत्सवानिमित्त दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ३६ जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवावर आधारित किमान दोन ते अडीच तासांचा गायन, वादन, नृत्य व संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये स्थानिक कलावंतांकडून स्थानिक कलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी वृत्तपत्र, निमंत्रण पत्रिका, बोर्ड-बॅनर, मोठे बॅनर व १०० बॅनर छपाई, संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग व फोटोग्राफी, कलावंतांना मानधन, बॅकड्रॉप एलईडी, स्वागत, सूत्रसंचालन, रांगोळी व स्टेज सजावट, साउंड सिस्टीम, लाईट व इतर अनुषंगिक बाबीची व्यवस्था करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, प्रसिद्धी व प्रसार करण्यासाठी संबंधित एजन्सींकडून दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात कोटेशन मागविण्यात येत आहेत. हे कोटेशन गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जमा करावे असे आवाहन जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande