
जळगाव , 17 सप्टेंबर (हिं.स.) सोने आणि चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दोन दिवस झालेल्या वाढीनंतर आज गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. यामुळे दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज गुरुवारी सकाळी सोन्याच्या दरात प्रति तोळा १७५१ रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५५,५३० रुपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी काल बुधवारी दिवसभरात १५४५ रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५७,२८१ रुपयांपर्यंत पोहचले होतेआज सोन्यापाठोपाठ चांदी दरातही मोठी घसरण झालीय. गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ३०९० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,३७,९३० रुपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी बुधवारी दिवसभरात ३०९० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४१,०२० रुपयांपर्यंत पोहचले होते.
दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केल्यानंतर जागतिक सोने-चांदी बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. FOMC बैठकीत फेडने फेडरल फंड्सचा लक्ष्य दर ३.७५ ते ४ टक्के केला आहे. फेडच्या या निर्णयानंतर अमेरिकी डॉलर आणि रोख्यांच्या उत्पन्नात हालचाल झाली. त्याचा परिणाम व्याज उत्पन्न न देणाऱ्या सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंवर झाला. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली. काही टप्प्यांवर सोन्याचा भाव ४३०० डॉलरच्या आसपास पोहोचला. त्यानंतर मात्र सोन्याने काहीशी सुधारणा नोंदवत ४,३१४ डॉलरच्या आसपास व्यवहार केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर