
रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीने महाराष्ट्रात ५७० कोटी रुपयांपेक्षा जास्त दाव्यांची परतफेड केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील ही कामगिरी असून यामुळे ४ लाखांहून अधिक नागरिकांना पाठबळ मिळाले आहे, अशी माहिती कंपनीतर्फे येथे देण्यात आली.
राज्यभरातील कुटुंबांना बदलत्या आरोग्य गरजांचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यातील आरोग्य विम्याची भूमिका स्टार हेल्थमुळे अधोरेखित झाली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांनी या तिमाहीत आरोग्यसेवा वापराचे प्रमुख पॅटर्न दर्शवले. ज्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख नागरी आणि नव्याने विकसित होणाऱ्या बाजारपेठांमधील उपचारांच्या गरजांची माहिती मिळते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीदरम्यान स्टार हेल्थने मुंबईत २८० कोटी रुपये मूल्याचे ४१,३०० हून अधिक दावे आणि पुण्यात ११५ कोटी रुपये मूल्याचे २०,५०० हून अधिक दावे निकाली काढले. एकूण, स्टार हेल्थने राज्यभरात ९३,००० पेक्षा जास्त दावे निकाली काढले.
अस्थिरोग व ट्रॉमा, नेत्ररोग, मूत्ररोग आणि कार्सिनोमा या आजारांवरील उपचारांसाठी दावे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ४०.४ टक्के दावे ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांकडून आले, जे ज्येष्ठ वयोगटातील सातत्यपूर्ण आरोग्य गरजा दर्शवतात.
स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे सीएमओ हिमांशू वालिया म्हणाले, अस्थिरोग व ट्रॉमा, नेत्ररोग, मूत्ररोग, कार्सिनोमा आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचे वाढते प्रमाण दर्शवते की, आरोग्य विम्याकडे आर्थिक नियोजनाचा एक आवश्यक भाग म्हणून का पाहिले पाहिजे आणि आरोग्य विमा लवकर का घेतला पाहिजे. आमचे आरोग्यसेवा जाळे, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतेचा मेळ घालून आरोग्य संरक्षण अधिक सुलभ व विश्वासार्ह बनवणे आणि ग्राहकांचा प्रवास सोपा करणे यावर आमचे लक्ष आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी