अमरावतीत जगन्नाथ पुरी धामची भव्य प्रतिकृती
अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.) । अमरावतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील आपल्या ऐतिहासिक आणि भव्य परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजापेठ येथील शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने यंदा ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी धाम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. मं
जगन्नाथ पुरी धामची अमरावतीत भव्य प्रतिकृती; शहीद भगतसिंग गणेश मंडळाचा मनमोहक देखावा


अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.) । अमरावतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील आपल्या ऐतिहासिक आणि भव्य परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजापेठ येथील शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने यंदा ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी धाम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. मंदिराची वास्तुकला, कलाकुसर, सजावट आणि प्रकाशयोजना यांचा बारकाईने वापर करून उभारण्यात आलेला हा देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

शहीद भगतसिंग गणेशोत्सव मंडळाला ७७ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. दरवर्षी धार्मिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक महत्त्व असलेला आगळावेगळा देखावा साकारण्याची मंडळाची परंपरा आहे. यंदा जगन्नाथ पुरी धामची प्रतिकृती साकारून ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. या देखाव्याचे उद्घाटन भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनावेळी ढोल पथकाच्या उत्साहपूर्ण वादनाने वातावरण भारावून गेले होते. ढोल पथकाचा उत्साह पाहून नवनीत राणा यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी स्वतः ढोल वाजवत उत्साहात सहभाग घेतला. यावेळी नवयुवकांनी मलखांबाचे प्रात्यक्षिकही सादर केले.परंपरेचा वारसा जपत आधुनिक प्रकाशयोजना आणि भव्य कलाकुसरीची जोड देण्यात आल्याने जगन्नाथ पुरी धामचा देखावा विशेष आकर्षण ठरत आहे. अमरावतीतच पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन होत असल्याचा अनुभव भाविकांना मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande