जळगाव : मेहरूण तलावातील गणेश घाटाची महापौरांकडून पाहणी
जळगाव , 17 सप्टेंबर (हिं.स.) शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मेहरूण तलावातील गणेश घाटाची पाहणी करून श्री गणेश विसर्जनाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, विद्युत
जळगाव : मेहरूण तलावातील गणेश घाटाची महापौरांकडून पाहणी


जळगाव , 17 सप्टेंबर (हिं.स.) शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मेहरूण तलावातील गणेश घाटाची पाहणी करून श्री गणेश विसर्जनाच्या पूर्वतयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गणेश विसर्जन सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी महापौरांनी आरोग्य विभागाला सविस्तर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. गणेश घाटावर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी निर्माल्य कलशांची संख्या पुरेशी वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी निर्माल्य प्लास्टिक पिशवीत आणू नये, असे आवाहन महापौरांनी केले. निर्माल्य कागदात गुंडाळून किंवा कागदी पिशवीत आणावे आणि थेट निर्माल्य कलशातच टाकावे, अशी सूचना करण्यात आली आहे. घरातून गणेश विसर्जनासाठी निघताना नागरिकांनी प्लास्टिक पिशवी सोबत आणू नये, असेही सांगण्यात आले. विसर्जनादरम्यान परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच अनावश्यक गर्दी टाळून शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महापौरांनी विसर्जन व्यवस्थेसाठी उपलब्ध तराफे, तैनात करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती घेतली.

विसर्जन काळात कर्तव्यावर असलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेचाही महापौरांनी आढावा घेतला.गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घाटावर आवश्यक त्या सुविधा आणि व्यवस्थांची तयारी करण्यात येत असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वच्छता व सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande