
लातूर, 17 सप्टेंबर (हिं.स.) । मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून हा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis