छ. संभाजीनगर जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा-2026 अंतर्गत विविध उपक्रम
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : ‘स्वच्छता ही सेवा-2026’ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमांतर्गत देशव्यापी श्रमदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘एक
छ. संभाजीनगर जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा-2026 अंतर्गत विविध उपक्रम


छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : ‘स्वच्छता ही सेवा-2026’ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमांतर्गत देशव्यापी श्रमदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमात जिल्ह्यातील गावपातळीवरील विविध घटकांना सहभागी करून मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

‘हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव’ तसेच ‘स्वच्छ सुजल गाव’ म्हणून गावांची घोषणा करण्यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानाच्या कालावधीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

‘स्वच्छता ही सेवा-2026’ अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे शासनस्तरावरून सनियंत्रण करण्यात येणार आहे. स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनावी, यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande