मराठवाड्याच्या लढ्यात बीड आणि अंबेजोगाईचा मोठा वाटा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने मुक्तीसंग्रामातील हुतात्मा वीर व स्वातं
Q


बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने मुक्तीसंग्रामातील हुतात्मा वीर व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले तसेच तेलंगणा व कर्नाटक मुक्तीसाठी योगदान देणाऱ्या वीरांनाही त्यांनी वंदन केले. मराठवाड्याच्या लढ्यात बीड आणि अंबेजोगाईचा मोठा वाटा राहिला असून, या ऐतिहासिक भूमीचा चेहरामोहरा बदलून 'सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड' घडवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, सांस्कृतिक व क्रीडा प्रकल्पांना गती दिल्याचे सांगत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावाही त्यांनी घेतला. मुक्तीसंग्रमादिनाच्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान शासकीय कार्यक्रमापूर्वी त्यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आदी उपस्थित होते.

आपले वडील दिवंगत बाजीराव पाटील हे स्वतः या संग्रामात मुक्तीसैनिक म्हणून सहभागी झाले होते, हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हा लढा राजकीय स्वातंत्र्यासह शिक्षण, स्वाभिमान व लोकशाही मूल्यांसाठी होता. हा इतिहास केवळ स्मरण करण्यापुरता नसून पुढील पिढीला प्रेरणा देणारा आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande