
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्तानं बीड येथील प्रियदर्शनी उद्यानातील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन या ऐतिहासिक लढ्यात बलिदान दिलेल्या वीर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यानंतर स्वराज्यजननी, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला आणि बलिदानाला कृतज्ञतापूर्वक नमन केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis