रत्नागिरी : भूमी अभिलेख विभागाची महसूल लोकअदालत २२ सप्टेंबरला
रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित अर्धन्यायिक प्रलंबित अपील प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा, या उद्देशाने २२ सप्टेंबर रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.ही लो
रत्नागिरी : भूमी अभिलेख विभागाची महसूल लोकअदालत २२ सप्टेंबरला


रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित अर्धन्यायिक प्रलंबित अपील प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा, या उद्देशाने २२ सप्टेंबर रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे.ही लोकअदालत दुपारी १ वाजता जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे पार पडेल.

पक्षकारांमधील वाद सामोपचाराने मिटवणे, वेळ व न्यायालयीन खर्च वाचवणे आणि नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकार आपापसातील संमतीने वाद मिटवण्यास तयार आहेत, अशा दाव्यांचा यामध्ये तातडीने निकाल लावला जाणार आहे.रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, लांजा आणि राजापूर या सर्व नऊ तालुक्यांतील अपीलकर्ते यात अर्ज करू शकतात. महसूल व वन विभागाच्या नियमांनुसार इच्छुक पक्षकारांना 'प्रपत्र अ' मधील महसूल लोकअदालत तडजोडनामा अर्ज भरावा लागेल. परस्परसंमतीच्या (Consent Terms) आधारे प्रकरणांचा निपटारा केला जाईल.

अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या ०२३५२-२२२८६३ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.जिल्ह्यातील नागरिकांनी या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने सोडवावीत, असे आवाहन भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande