रत्नागिरी : कोकणनगर आरोग्य केंद्रात शिबिर व वृक्षारोपणाने सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ
रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘सेवा परमो धर्म:’ हा विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात आजपासून १७ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा संकल्प अभिय
सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ वृक्षारोपणाने करताना वैदेही रानडे


रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच ‘सेवा परमो धर्म:’ हा विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात आजपासून १७ ऑक्टोबरपर्यंत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोकणनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते केंद्राच्या आवारात वृक्षारोपण पार पडले. दीपप्रज्वलन आणि धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या, शासनाकडून जनतेला जास्तीत जास्त सेवा मिळाव्यात हा या अभियानाचा मुख्य संकल्प आहे. महिनाभरात 'आरोग्याचा श्री गणेशा', वृद्धांची देखभाल, विशेष लसीकरण मोहिमा आणि आयुष केंद्रांवर योगसाधना यांसारखे उपक्रम राबवले जातील. नागरिकांनी या सेवांचा लाभ घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी अभियानाला शुभेच्छा देत नागरिकांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि आरोग्य सेवांचा सक्रिय लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande