विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुनावण्यांना उपस्थित राहण्याचे मतदारांना आवाहन
पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादीमध्ये नाव मॅपिंग झालेले नाही अथवा नावात पत्त्यात अथवा जन्मतारखेत विसंगती असलेल्या मतदारांसाठी २८ सप्टेंबर पासून सुनावण्या सुरू होणार आहेत. मतदारांनी आपापल्या विभाग
Voter


पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादीमध्ये नाव मॅपिंग झालेले नाही अथवा नावात पत्त्यात अथवा जन्मतारखेत विसंगती असलेल्या मतदारांसाठी २८ सप्टेंबर पासून सुनावण्या सुरू होणार आहेत. मतदारांनी आपापल्या विभागातील मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सुनावणीला उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.

सुनावण्यांचे वेळापत्रक pune.gov.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे नाव विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी समाविष्ट झाले नाही अशा मतदारांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म नंबर ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. ऑफलाइन अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावा असेही कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande