बीड-पुणे नवीन रेल्वे मार्गाचे सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बीड-पुणे नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. या ऐतिह
अ


बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बीड-पुणे नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यास आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने उपस्थित राहून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बीड-पुणे रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याला पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांशी जोडणी अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. या रेल्वे मार्गाचा विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी लाभ होणार असून, जिल्ह्यातील दळणवळण आणि आर्थिक हालचालींना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, रेल्वे जोडणीमुळे जिल्ह्यातील विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande