मोहोळ पंचायत समितीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण
सोलापूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मोहोळ पंचायत समितीच्या प्रशासकीय काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची विभागीय स्तरावर सखोल चौकशी करावी, तसेच १५ वा वित्त आयोगाच्या निधी वाटपाची तातडीने चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत मंजूर निधीच्या वाटपाला स्थगिती द्
Ksjs


सोलापूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

मोहोळ पंचायत समितीच्या प्रशासकीय काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची विभागीय स्तरावर सखोल चौकशी करावी, तसेच १५ वा वित्त आयोगाच्या निधी वाटपाची तातडीने चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत मंजूर निधीच्या वाटपाला स्थगिती द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य बाळासाहेब गायकवाड, धनाजी माळी, डॉ. अमित व्यवहारे आणि गणेश मुळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या सदस्यांची सविस्तर भेट घेतली. यावेळी त्यांच्या मागण्या, संबंधित कागदपत्रे तसेच पंचायत समितीच्या प्रशासकीय काळातील कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. सदर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून वस्तुनिष्ठ चौकशी करावी, संबंधित बाबींची तपासणी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली.

तसेच १५ वा वित्त आयोगाच्या निधी वाटपाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंजूर निधीच्या वाटपाबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.

सार्वजनिक निधी हा जनतेच्या विकासासाठी असतो. त्यामुळे त्याचा वापर पारदर्शक आणि नियमानुसार होणे आवश्यक आहे. पंचायत समितीच्या कारभाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची सक्षम प्राधिकरणामार्फत निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे आहे.

उपोषणकर्त्या सदस्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी. तसेच आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून या प्रश्नावर मार्ग काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande