सोलापूर माध्यमिक शिक्षण विभाग कारभारावर शिक्षणाधिकारी, जिप सदस्यांसह शिक्षक संघटना नाराज
सोलापूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। सोलापूरचा माध्यमिक शिक्षण विभाग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह शिक्षक संघटना सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचे बो
Zp


सोलापूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

सोलापूरचा माध्यमिक शिक्षण विभाग सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह शिक्षक संघटना सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते.

रोजच काही ना काही गोंधळ या माध्यमिक शिक्षण विभागात होत असतानाचे दिसत आहे. मंगळवारी एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी गोंधळ घातल्यानंतर लगेच बुधवारी पंचायत समितीच्या माजी सभापती तथा जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य सोनाली कडते यांनी आपले पती प्रशांत कडते यांच्यासोबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोरच बराच वेळ या मांडला होता. त्यांनी शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यासह विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.

दरम्यान सकाळी साडेअकरा वाजता सदस्या कडते या आपल्या पतीसोबत शिक्षण विभागात आले असता बरेच कर्मचारी टेबलावर दिसून आले नाहीत तसेच त्यांचे हजेरी पत्रकावर सुद्धा सही नव्हती. काही वेळाने हे दोन्ही कर्मचारी कार्यालयात दाखल झाले. एकूणच परिस्थिती पाहता सदस्य कडते यांनी उपशिक्षणाधिकारी प्रकाश नांगरे यांना याबाबत विचारणा केली त्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले त्यांनी तात्काळ वरिष्ठ सहाय्यक अनिल पाटील आणि वरिष्ठ लिपिक अरविंद ताटे यांना एक दिवसाचे विना वेतन करण्याचा आदेश आपल्या सहीनुसार काढला.

शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे जिल्हा परिषदेत दाखल झाल्यावर त्यांच्या मागोमागच अनिल पाटील दाखल झाले त्यामुळे अनिल पाटील हे कार्यालय सोडून शिक्षण अधिकाऱ्यांच्या मागे फिरत होते का? पाटील हे कार्यालयात कमी अन् शिक्षणाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जास्त असतात अशी कायम कुरबुर जिल्हा परिषदेमध्ये ऐकण्यास मिळते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande