
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे सदस्य आणि शेतकरी आपल्या मागण्यांसाठी पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना ध्वजवंदनाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आले. बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना अडवण्यात आले.
ज्या शेतकऱ्यांच्या कष्टावर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उभी आहे, त्यांनाच अतिरेकी किंवा नक्षलवादी असल्यासारखी वागणूक देणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही.
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखता येईल; मात्र त्यांचा आवाज रोखता येणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.असे डॉ. सतीश पाचपुते जिल्हाध्यक्ष, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis