निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयात २५०० हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचे धडे
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे एकाच वेळी २५०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सुरक्षिततेविषयी विशेष जनजागृतीपर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी जाधव साहिल आणि परमेश्वर पां
डिजिटल धडे


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे एकाच वेळी २५०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सुरक्षिततेविषयी विशेष जनजागृतीपर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थी जाधव साहिल आणि परमेश्वर पांद्रे यांच्या पुढाकाराने, क्विक हील फाउंडेशन यांच्या सहकार्याने हे सत्र घेण्यात आले.

या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील विविध धोके आणि त्यापासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. विशेषतः फोटो मॉर्फिंग, ऑनलाइन मायक्रोफोनचा अनधिकृत वापर, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता तसेच डिजिटल फसवणुकीपासून बचाव याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. २५०० हून अधिक विद्यार्थ्यांची एकाच वेळी उपस्थिती आणि त्यांचा सक्रिय सहभाग हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करून सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराची सवय लावणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे झालेल्या या भव्य जनजागृतीपर सत्राला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande