
नंदुरबार, 18 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी मंगळवार, 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता याहामोगी सभागृह, जिल्हा परिषद,नंदुरबार येथे निवृत्ती
वेतनधारकांच्या अडीअडणींचे निराकरण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे., असे जिल्हा
कोषागार अधिकारी सं. म. खडसे यांनी कळविले आहे.
या कार्यशाळेत निवृत्ती वेतन धारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपचे मिळणार मार्गदर्शन केले जाणार
आहे. राज्य शासनाने निवृत्ती वेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे विशेषृत मोबाईल ॲप विकसीत केले आहे.
या ॲपच्या माध्यमातून निवृत्ती वेतनधारकांना घरबसल्या मासिक व वार्षिक निवृत्ती वेतनाचा तपशील,
उत्पन्नाचा दाखला आणि फॉर्म नं. 16 यांसारख्या सुविधा मोबाईलवरच उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे,
याद्वारे हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधाही लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. कार्यशाळेत
या ॲपविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी येताना आपला
पी.पी.ओ. (PPO) क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सोबत घेऊन यावा. सर्व
निवृत्ती वेतनधारकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर