आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: क्विंसी टेकबॉल महिला एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात खेळणार
नागोया (जपान), 19 सप्टेंबर (हिं.स.) भारताच्या क्विंसी जोआकिम डिसूझाला टेकबॉल महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आणि आता ती कांस्यपदकासाठीच्या सामन्यात खेळणार आहे.जपान आणि कंबोडियाच्या खेळाडूंवर विजय मिळवून डिसूझाने ''गट अ''
क्विंसी जोआकिम डिसूझा


नागोया (जपान), 19 सप्टेंबर (हिं.स.) भारताच्या क्विंसी जोआकिम डिसूझाला टेकबॉल महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आणि आता ती कांस्यपदकासाठीच्या सामन्यात खेळणार आहे.जपान आणि कंबोडियाच्या खेळाडूंवर विजय मिळवून डिसूझाने 'गट अ' मध्ये अव्वल स्थान पटकावले होते आणि उपांत्य फेरीत तिची गाठ इंडोनेशियाच्या सुमायाशी पडली.

उपांत्य फेरीत तिचा सामना इंडोनेशियाच्या सुमायाशी झाला, ज्यात तिला १-२ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय खेळाडूने पहिला सेट १२-७ असा जिंकला, मात्र त्यानंतर सुमायाने ९-१२ आणि ७-१२ अशा फरकाने सलग दोन सेट जिंकत सामना आपल्या नावे केला.

याआधी, डिसूझा आणि मोहम्मद अनस इम्रान बेग यांनी टेकबॉल मिश्र दुहेरीच्या 'रिपेचार्ज' फेरीत फिलिपिन्सच्या अबुलेंसिया जोआना आणि ऑगस्टिन प्रिन्स यांचा २-० असा पराभव करून कांस्यपदकाच्या सामन्यासाठी पात्रता मिळवली होती. ही भारतीय जोडी आता रविवारी पदकासाठी आपले आव्हान पुढे चालू ठेवेल. डिसूझा-बेग जोडीने रिपेचार्ज फेरीतील पहिला सेट १२-३ आणि दुसरा सेट १२-६ असा जिंकत सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

तत्पूर्वी, मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत डिसूझा आणि बेग यांना व्हिएतनामच्या जियान न्घी त्रिन आणि होआंग मिन्ह टॅन गुयेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. पहिल्या सेटमध्ये लय शोधण्यासाठी संघर्ष करावा लागल्याने भारतीय जोडीला १२-७ असा पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना ०-२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत व्हावे लागले. दुसऱ्या सेटमध्ये त्यांनी अधिक चांगली लढत दिली, परंतु व्हिएतनामी जोडीने तो सेट १२-१० असा जिंकल्यामुळे त्यांना निर्णायक सेटपर्यंत मजल मारता आली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande