
नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.)कृषीमंत्र्यांकडे संकटात सापडलेल्या बळीराजाला तातडीने दिलासा देण्याची मागणी विधान परिषद आमदार सुहास शिरसाठ यांनी केली आहे. कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाची पीक परिस्थितीबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत ऑनलाईन उपस्थित राहून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.पावसाच्या खंडामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही वस्तुस्थिती मी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, प्रशासनामार्फत तातडीने पीक परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि दुष्काळी उपाययोजना युद्धपातळीवर सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी केली. प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मदत मिळेपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis