
जळगाव, 19 सप्टेंबर (हिं.स.) सोने आणि चांदीच्या दरातील चढ-उतार शनिवारीही कायम राहिला आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल १,४२० रुपयांची वाढ झाली असून दुसरीकडे, चांदीच्या दरातही प्रति किलो ५ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.शुद्ध सोन्याच्या म्हणजेच २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज १० ग्रॅममागे १,४२० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव १,५५,८४० रुपयांवर पोहोचला आहे. त्यानुसार १ ग्रॅम सोन्याचा भाव १५,५८४ रुपये, ८ ग्रॅमचा भाव १,२४,६७२ रुपये, तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव १५,५८,४०० रुपये झाला आहे.दागिन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. प्रति १० ग्रॅम १,३०० रुपयांनी वाढ झाल्याने २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४२,८५० रुपये झाला आहे. १ ग्रॅमसाठी १४,२८५ रुपये, ८ ग्रॅमसाठी १,१४,२८० रुपये, तर १०० ग्रॅमसाठी १४,२८,५०० रुपये मोजावे लागतील.हलक्या वजनाच्या आणि डिझायनर दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली. प्रति १० ग्रॅम १,०६० रुपयांची वाढ झाल्याने १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१६,८८० रुपये झाला आहे. १ ग्रॅमचा भाव ११,६८८ रुपये, ८ ग्रॅमचा ९३,५०४ रुपये, तर १०० ग्रॅमचा भाव ११,६८,८०० रुपये झाला आहे.
सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. शनिवारी चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल ५ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता एक किलो चांदी खरेदीसाठी २,५५,००० रुपये मोजावे लागणार आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक बाजारातील मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफ बाजारातील ताजे दर, जीएसटी आणि घडणावळ यांची माहिती घेणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर