भारतीय 19 वर्षाखाली संघाचा ऑस्ट्रेलियावर ७ धावांनी विजय
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय आणि ऑस्ट्रेलियन १९ वर्षांखालील संघांमधील तीन सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रोमांचक ठरला. पावसामुळे बाधित झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सात धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करता
आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविड यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय आणि ऑस्ट्रेलियन १९ वर्षांखालील संघांमधील तीन सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रोमांचक ठरला. पावसामुळे बाधित झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सात धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत सहा गडी गमावून १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला सात गडी गमावून केवळ १७५ धावाच करता आल्या.

भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड आणि भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग हे देखील या सामन्यात मैदानात उतरले होते. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अन्वयने अवघ्या १८ चेंडूंमध्ये ३८ धावांची वेगवान खेळी केली. त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट २११.११ होता. आर्यवीरने आपल्या वडिलांप्रमाणेच डावाची सुरुवात केली आणि पाच चौकारांसह २६ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि १२ व्या षटकापर्यंत त्यांची धावसंख्या चार गडी गमावून ८८ झाली होती. यानंतर, यशवर्धन चौहान आणि अन्वय द्रविड यांनी पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

चौहानने ३४ चेंडूंमध्ये ५४ धावांची शानदार खेळी केली. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. अन्वयनेही जलद धावा करून भारताची धावसंख्या १८२ पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियासाठी ऑफ-स्पिनर एली ब्रेन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने चार षटकांत २९ धावा देऊन दोन बळी घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande