नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठकीत काजू-बदामाच्या पाहुणचारावरून टीका
नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान
नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठकीत काजू-बदामाच्या पाहुणचारावरून टीका


नांदेड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या पाहुणचारासाठी काजू-बदामासह सुका मेवा ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने त्यावरून टीका सुरू झाली आहे.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक सुरू आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगितले जात असून, दुष्काळ जाहीर करण्यासह नुकसानभरपाई आणि अन्य मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशा पार्श्वभूमीवर बैठकीतील पाहुणचाराच्या व्यवस्थेवरून विरोधक आणि विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

या बैठकीला राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री अतुल सावे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार रामराव वडकुते, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार कल्याण काळे, खासदार अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, चंद्रकांत नवघरे, बाबुराव पाटील कोहळीकर, सैईद खान, कैलास पाटील, अमर राजूरकर, तुषार राठोड, आनंदाराव पाटील बोंढारकर यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे बैठकीला ऑनलाइन सहभागी झाले आहेत.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीतील खाद्यपदार्थांच्या व्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीवर चर्चा होत असताना लोकप्रतिनिधींसाठी काजू-बदामाचा पाहुणचार करण्यात आल्याने या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या बैठकीत दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसान, शेतकऱ्यांना मदत आणि नुकसानभरपाई याबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande