
वर्धा, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दीपके सध्या फुल फार्मात असल्याचे चित्र आहे. आज ते वर्धा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर बेधडक मते मांडली. निवडणुका, परीक्षा, पेपर फूट, शिक्षण व्यवस्था, शालेय शुल्क व अन्य बाबतीत त्यांनी हातचे राखून नं ठेवता सरकारवर टीका केली. निवडणूक आयोगावर ते सडकून बोलले.
दीपके म्हणाले की निवडणुका फार्स झाल्या आहेत. आयुक्त ज्ञानेश कुमार यांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्हाला निवडणूक चिन्ह चोरायच आहे, त्यांच्या उमेदवाराला कारागृहात टाकायचं आहे. यापेक्षा तुम्ही निवडणूकच रद्द करा ना! तुम्ही निवडणुकीचा देखावा करता. देशातील सर्व निवडणुकाच रद्द करा न.जेवढेही निवडणूक आयुक्त आहे त्यांनी भाजपच्या मुख्यालयात जाऊन बसून जावे. पेट्रोलचा, फोन बिलंचा खर्च वाचून जाईल. तेथून ऑर्डर घेण्यात याव्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना मी विनंती करतो की आपण भाजपाला जिंकविण्यासाठी खूप मेहनत करत आहे. प्रत्येक राज्यात आपण पक्ष फोडले, मतदार यादीतून मतदार नाव वगळले एवढ्या मेहनतीनंतर तुम्हाला थोडं क्रिडीट मिळायला हवं तुम्हाला मंत्रिपद तरी मिळायला हवं किंवा राज्यसभेची उमेदवारी तरी मिळायला हवी याकरिता ज्ञानेश कुमार यांना अधिकृत रित्या भाजपात प्रवेश घ्यावा लागेल यात तुमचाही फायदा होईल.
कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट दिली. बापू कुटीची पाहणी करत अभिजीत दीपके आश्रमाची माहिती समजून घेतली. सेवाग्रामच्या बापू कुटीपासून अभिजीत दीपके यांच्या वर्धा दौऱ्याला सुरुवात झाली.
वर्धेत आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आलो आहे, असे दीपके यांनी स्पष्ट केले.एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे.पेपर फुटीसाठी एमपीएससीचे जे चेअरमन आहे विवेक भीमनवार यांचा राजीनामा मागत आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे तीच आमची मागणी आहे. कारण भीमनवार यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. त्यांना एमपीएससीचा चेअरमन कसा बनवलाय याचा मला आश्चर्य वाटतं. कारण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र होते म्हणून त्यांना एमपीएससीचे चेअरमन बनवण्यात आलं का? असा सवाल दिपके यांनी केला. कारण त्यांच्या नियुक्तीनंतरच एमपीएससीची पेपर फुटी झाली आहे. त्यानंतरही त्यांनी मुलाखती घेतल्या. आणि प्रोविजन लिस्ट सुद्धा काढली आणि ते म्हणतात की पेपर आधीच फुटला होता. या पेपर फुटीची कुठे ना कुठे जबाबदारी या एमपीएससी चेअरमन ची आहे, त्यामुळे यांचा राजीनामा झाला पाहिजे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी