
सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ४९८ एकर परिसरातील दोन एकर जागेत खेलो इंडिया योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेला मल्टिपर्पज इनडोअर स्पोर्ट्स हॉल अंतिम टप्प्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा असा हा हॉल असल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. ६० बाय ४० मीटर आकाराच्या या हॉलसाठी सुमारे १४ कोटी ५० लाख रुपये खर्च झाला असून, तब्बल पाच हजार प्रेक्षकांच्या आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी खेलो इंडिया योजनेअंतर्गत विद्यापीठाला ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. उर्वरित १० कोटी रुपयांचा खर्च विद्यापीठाने केला आहे. सध्या हॉलचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, फायर फायटिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे.फायर फायटिंगसह उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे दीड महिन्यात हा हॉल विद्यापीठाच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. हॉल सुरू झाल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह विविध क्रीडा स्पर्धांसाठीही त्याचा उपयोग होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड